अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- सिनेसृष्टीतून एक अत्यंत महत्वाची व दुःखद बातमी समोर येत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.
ते ९३ वर्षांचे होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या चित्रपटसृष्टीला समर्पित केलं होतं. रमेश देव यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
रमेश देव यांच्या सिनेकारकिर्दीची सुरुवात ही 1950 मध्ये झाली. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही आपल्या भूमिकेची छाप सोडली. सुरुवातीला त्यांना हिंदीत छोट्या भूमिका मिळाल्या.
मात्र त्यानंतर त्यांना हिंदी सिनेमात सहकलाकाराचा भूमिका साकारण्याची संधी मिळाली. दरम्यान अवघ्या 3 दिवसांपूर्वी रमेश देव यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने देव यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र वाढदिवसाच्या अवघ्या 3 दिवसांनी रमेश देव यांनी जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठी हाणी झाली आहे.