Big News : चेन्नई सुपर किंग्ज संघाला ४ विजेतेपद मिळवून देणारा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील शेवटचा सामना खेळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग चा आज ६८ वा सामना मुंबईतील (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) होणार आहे. याच स्टेडियम वर महेंद्रसिंग दोन्ही IPL शेवटचा सामना खेळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध लढत होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीवर असतील, जो या मोसमातील शेवटचा सामना खेळणार आहे.
तसे, धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असू शकतो असा अंदाज सोशल मीडियावर वर्तवला जात आहे. चालू आयपीएल हंगामात जेव्हा धोनीने रवींद्र जडेजाकडून कर्णधारपदाची धुरा स्वीकारली तेव्हा त्याला विचारण्यात आले की तो 2023 मध्ये सीएसकेकडून खेळणार का?
यावर धोनी म्हणाला होता, ‘तुम्ही मला पिवळ्या जर्सीत नक्कीच पाहाल, पण जर्सीचा रंग कसा असेल यावर काही सांगता येत नाही.’ धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती,
परंतु तो आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळत राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची लोकप्रियता अबाधित आहे. देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू असण्यासोबतच 40 वर्षीय धोनी हा जागतिक स्तरावरचा आयकॉन देखील आहे.
धोनीने संघाला चार आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली
एमएस धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय सीएसके त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएलचा उपविजेता ठरला आहे.
एवढेच नाही तर धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही जिंकले होते. एमएस धोनीने आतापर्यंत 233 आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान धोनीने 39.30 च्या सरासरीने 4952 धावा केल्या आहेत ज्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 135 झेल आणि 39 स्टंपिंग केले आहेत. धोनीशिवाय, दिनेश कार्तिक हा एकमेव यष्टीरक्षक आहे ज्याने आयपीएलमध्ये 150 हून अधिक शिकार केल्या आहेत.