ताज्या बातम्या

शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा, तब्बल ७ हजार ८०० अपात्र उमेदवार

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात रोज नवीन खळबळजनक माहिती समोर येत असतानाच आता नवीन खुलासा समोर आला आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ म्हणजेच टीईटीसाठी अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थांना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थीना पात्र ठरवण्यात आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थीना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याच्या या खुलाशामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या आधी २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठवरण्यात आल्याची शक्यता असल्याने या परीक्षांचाही तपास केला जात आहे.

या प्रकरणाचा तरपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेली माहिती आणि मूळ निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून केली जात आहे.

२०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून झालेल्या भरतीमधील शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत का याची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण परिषदेने नुकताच घेतलाय.

यासाठी राज्यामधील सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांना तपासासंदर्भातील आदेश देण्यात आलेत. पुणे सायबर पोलीस सध्या २०१८ आणि २०२० मधील टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts