Maharashtra news : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना १२ जून रोजी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
या दरम्यान, त्यांच्या प्रकृतीसंबंधी महत्वाची माहिती काँग्रेसकडून जारी करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्या रुग्णालयात आहेत.सोनिया गांधी यांच्या श्वासनलिकेत फंगल इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले आहे.
त्यावर आता उपचार सुरू आहेत. गांधी यांना कोरोना झाला होता. त्यातून बऱ्या झाल्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागला. त्यांच्या नाकातून रक्त वाहत होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेथे तपासणी आणि उपचारादरम्यान काल त्यांच्या श्वासनलिकेत फंगल इन्फेक्शन आढळून आले आहे. त्या दृष्टीने आता उपचार सुरू आहेत, असे हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले.