ताज्या बातम्या

OPPO Reno8T 5G : ओप्पोच्या 5G फोनवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, जाणून घ्या फीचर्स

OPPO Reno8T 5G : काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात लाँच झालेल्या OPPO Reno8T 5G फोनवर बंपर सवलत मिळत आहे. कंपनीचा हा फोन 108MP प्राथमिक आणि 32MP सेल्फी कॅमेरासह सुसज्ज आहे. या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे.

परंतु, यावर बँक ऑफरसह कॅशबॅकच्या ऑफर उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. कारण आता ओप्पोच्या 5G फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर दिली जात आहे. त्यामुळे अशी संधी गमावू नका.

स्वस्तात विकत घेता येणार स्मार्टफोन

कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये ठेवली आहे. ICICI बँक, SBI कार्ड्स, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक, वन कार्ड, एयू स्मॉल फायनान्स बँक आणि इंडसइंड बँक कार्डांना 10% कॅशबॅकचा लाभ मिळत आहे. याची विक्री 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ऑफरमध्ये, Enco Air3 फोनसोबत फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले दिला असून तो 950 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच या फोनचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. स्टोरेज बद्दल सांगायचे झाले तर यात 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. हा फोन Android 13 वर आधारित असून जो ColorOS 13 वर काम करतो.

कॅमेरा

कंपनीच्या या फोनमध्ये 4800mAh ची पॉवरफुल बॅटरी असून जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 108MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर, 2MP मायक्रोस्कोप लेन्स आहे. त्याच वेळी, आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनीकडून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचा हा फोन Flipkart वर मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts