ताज्या बातम्या

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक; १८ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरुच

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच १८ दिवसांपासून धरणे आंदोलन देखील भाजपकडून करण्यात येत आहे.

62 वर्षीय नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. मलिक हे राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाचे प्रमुखही आहेत. ते परभणी आणि गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी मंत्रीही आहेत. नुकताच त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, नवाब मलिक यांची खाती तात्पुरत्या स्वरूपात अन्य कोणाला तरी दिली जाऊ शकतात. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेतील.

खरे तर, गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे नेते नवाब मलिक प्रकरणाशी संबंधित पैलूंवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली होती. यानंतर जयंत पाटील म्हणाले.

पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मलिक यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली असल्याने पक्ष त्यांचा राजीनामा मागणार नाही.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

Renuka Pawar

Recent Posts