ताज्या बातम्या

शरद पवार यांच्यावर केलेला जातीवाद आणि नास्तिकतेचा आरोप भाजप व मनसेला भोवणार? गृहखात्याने घेतले चौकशीचे सूत्र हाती

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीवाद आणि नास्तिकतेचा आरोप केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या (Bjp) या आरोपानंतर आता गृह विभागाकडून (Home Ministry) शरद पवार यांचा व्हिडीओ (Video) शेअर केल्या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. पवार यांचं वक्तव्य अर्धवट दाखवत चुकीचा संदेश गेल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

त्यामुळे या प्रकरणात काही कायदेशीर कारवाई करता येते का, याची संपूर्ण माहिती गृहखातं काढणार आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी ९ मे रोजी साताऱ्यातील सभेत केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

‘नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देव देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतची चौकशी गृहखातं करणार आहे.

भाजपचा आरोप काय?

‘नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देव देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवी देवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असंच वक्तव्य करा’ असा सल्लाही भाजपच्या ट्विटर हँडलवरुन पवारांना देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts