ताज्या बातम्या

Black Guava Farming: काळ्या पेरूची शेती ठरणार बळीराजासाठी तारणहार; वाचा काळ्या पेरूच्या शेतीची ए टू झेड माहिती

Black Guava Farming : भारत हा कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती व्यवसायावर (Farming) अवलंबुन आहे.

यामुळे मायबाप शासन (Government) तसेच देशातील वैज्ञानिक (Agriculture Scientists) शेतकऱ्यांच्या उत्पादनात (Farmers Income) वाढ करण्यासाठी रोजाना नवनवीन शोध लावत असतात.

देशातील वेगवेगळ्या संस्था आणि शास्त्रज्ञ पिकांच्या नवीन आणि सुधारित जातींची (Crop Varieties) निर्मिती करत असतात. बिहार कृषी विद्यापीठाणे (Bihar Agriculture University) देखील पेरूची अशीच एक नवीन सुधारित जातं विकसित केली आहे.

या विद्यापीठाणे विकसित केलेली ही पेरूची जातं काळ्या कलरची आहे. या नव्याने विकसित केलेल्या पेरूचा कलर हा काळा असून आतून हा पेरू लाल रंगाचा आहे. पेरूची ही जातं खाण्यासाठी चविष्ट असून आरोग्यासाठी खुपच फायद्याची आहे. काळ्या कलरच्या या पेरूने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

आरोग्यासाठी उत्तम आहे काळा पेरू
बिहार विद्यापीठाणे विकसित केलेला हा काळा पेरू आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. यामध्ये सामान्य पेरूपेक्षा अधिक औषधी गुणधर्म असल्याचा दावा केला जातं आहे.

या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट, खनिजे आणि जीवनसत्त्वे इतर पेरूच्या जातीच्या तुलनेत अधिक असल्याने हा पेरू कमी कालावधीत लोकांना आवडणार असल्याचा दावा वैज्ञानीक करत आहेत.

किती मिळतं उत्पादन
मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो कि, बिहार कृषी विद्यापीठात काळ्या कलरची पेरूची झाडे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे आता या पेरूच्या झाडापासून उत्पादन देखील मिळू लागले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, या एका झाडापासून सुमारे 5 किलो पेरूचे उत्पादन प्राप्त होतं आहे. एका पेरूच्या फळाचे वजन सुमारे 100 ग्रामच्या आसपास आहे. आता बिहार कृषी विद्यापीठ पेरूची ही नवीन जातं शेतकऱ्यांना उपलब्ध कशी करून देता येईल यावर विचार करत असून लवकरच शेतकऱ्यांना ही जातं उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शास्त्रज्ञाच्या मते, या पेरूच्या जातीचा दर्जा लवकरच सुधारला जाणार आहे. याच्या व्यवसायिक स्तरावर शेतीसाठी लवकरच ही जातं तयार होणार आहे. भारतातील हवामान या पेरूच्या जातीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जातं आहे.

सध्या ट्रायल म्हणून विद्यापीठात याची चाचणी केली गेली आहे. विशेष म्हणजे यात यश देखील शास्त्रज्ञाना मिळाले आहे. निश्चितच भविष्यात शेतकऱ्यांना या काळ्या पेरूच्या जातीचा फायदा होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts