BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज !

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या नवीन पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने आपले अर्ज पाठवायचे आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “आहारतज्ञ आणि समुपदेशक, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत आहारतज्ञ आणि समुपदेशक, स्टाफ नर्स पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 02 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

आहारतज्ञ आणि समुपदेशक पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

ऑफलाईन अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

-आहारतज्ञ आणि समुपदेशक पदासाठी अर्ज ‘लो. टी. म. स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात’ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

-स्टाफ नर्स पदासाठी अर्ज बालरोग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

PDF जाहिरात 1

 PDF जाहिरात 2

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts