अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत दिली.
राज्यातील कोरोना व्यवस्थापनासाठी सरकार करत असलेल्या कामाला बँकेनेही या माध्यमातून हातभार लावला आहे. बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. स्व. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या विचारांनी कार्यरत असलेल्या जीएस महानगर कॉ-ऑप. बँकेनेही 35 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली.
बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी मदतीचा धनादेश आज सरकारला सुपूर्द केला. या सोबतच ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर असोसिएशन यांच्या कडूनही कोविड विरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 35 लाख रुपयांची मदत करण्यात आली. #AIWPA च्या पदाधिकाऱ्यांनी सदर रकमेचा धनादेश आज सरकारला सुपूर्द केला.