ताज्या बातम्या

ब्रेकिंग : १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा, हायकोर्टाच्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचना

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Maharashtra news :- प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला एसटीचा संप आणि त्यासंबंधीची न्यायालयीन सुनावणीसंबंधी आज महत्वाची घडामोड घडली आहे. उच्च न्यायालयाने प्रथमच यासंबंधी एसटी कर्मचारी आणि सरकारलाही स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे.

त्यानंतर ते रुजू झाले नाहीत, तर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार मोकळे राहील. मात्र कर्मचारी संप मिटवून कामावर रुजू होण्यास तयार असतील तर त्यांना कारवाईच्या भीतीविना रुजू होऊ द्यावे, अशा सूचना न्यायालयाने केल्या आहेत.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करता येणे शक्य नाही, ही आयोगाची शिफारस स्वीकारल्याचे सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

कर्मचारी हजर झाले तर त्यांच्यावर बडतर्फी किंवा अन्य कारवाई करू नये. गुन्हे दाखल झालेल्यांनाही कामावरून काढू नये, अशी सूचना करण्यात आली. त्यावर महामंडळच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्या सकाळी १० वाजता पुन्हा सुनावणी ठेवली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts