IMD : भारतीय हवामान विभागाने यावर्षीचा मान्सून (Monsoon) चालू महिन्यात म्हणजेच मे महिन्यातच (May Month) केरळमधे (Kerala) दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. हवामान विभागाच्या या माहितीने लोकांमध्ये आनंद (Happy) पाहायला मिळतो आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार आहे. आठवड्याभरात आंदमानमध्ये (Andamans) मान्सून धडकणार असल्याचे सांगितले आहे. तर तळकोकणात देखील २७ मे ते २ जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचे अंदाज वर्तवले आहेत. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. १३ ते १९ मे च्या दरम्यान अंदमानच्या समुद्रावर पाऊस होऊ शकतो.
तर आंदमनात मान्सून हा २२ मे पर्यंत दाखल होत असतो मात्र, तो देखील आता वेळीपूर्वीच येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर केरळात २० ते २६ मे दरम्यान तो सक्रीय होईल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ४ आठवडे कसे राहतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मान्सूनचे आगमन तर वेळेपूर्वीच होणार हे स्पष्ट झालं आहे पण राज्यात केव्हा मान्सून दाखल होणार याची माहिती ही १५ मे रोजी दिली जाणार आहे.