ताज्या बातम्या

Cow Rearing: गाईच्या ‘या’ देशी जातींचे पालन पशुपालक शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान; 50 लिटरपर्यंत दुध उत्पादन क्षमता

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Cow Rearing:- भारत एक कृषिप्रधान देश आहे आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) करत आहेत.

फक्त शेती क्षेत्रावर (Agriculture) आर्थिक प्रगती साधणे अशक्य असल्याने शेतकरी बांधव पशुपालन व्यवसायाची जोड देत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांचे (Farmer) जीवनमान चांगल्यापैकी उंचावले गेले आहे.

देशात अनेक पशुपालक शेतकरी गाईंचे पालन करत असतात. पशुपालक शेतकरी (Livestock Farmer) मुख्यता पशुपालन दुग्ध उत्पादनासाठी करत असतात.

यामुळे योग्य जातीच्या गाईंचे पालन (Cow Farming) करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. म्हणून आज आपण चांगल्या दुध देणाऱ्या देशी गाईंच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण माहिती विषयी.

साहिवाल गाय (Sahiwal cow)
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, साहिवाल ही गाय प्रामुख्याने भारताच्या उत्तर-पश्चिम भागात आढळते. असे असले तरी या गाईचे आता संपूर्ण भारतभर पालन केले जाऊ लागले आहे.

साहिवाल गाय गडद लाल रंगाची असते. साहिवाल गाईचे शरीर लांब, सैल आणि जड अशा आकाराचे असते. मित्रांनो साहिवाल जातीच्या गायीचे कपाळ रुंद असून शिंगे जाड व लहान असतात. ही गाय 10 ते 16 लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते. यामुळे पशुपालक शेतकरी या गाईचे संगोपन करून चांगला नफा कमवू शकतात.

गीर गाय (Gir Cow)
गीर जातीची गाय प्रामुख्याने गुजरातमध्ये आढळत असते. गुजरातच्या गीर जंगलात या गाईचे वास्तव्य अधिक काळ असल्याने या गाईला गिर असं नाव मिळाले असेल असे सांगितले जाते.

गीर जातीच्या गाईच्या आकाराबद्दल सांगायचे तर, तिची शिंगे कपाळापासून मागे वाकलेली असतात. या जातीच्या गायीचे कान लांब व लटकलेले असतात. गीर गाईचे शेपूट देखील खूप लांब असते, शेपूट जमिनीला स्पर्श करते.

गीर गायीच्या शरीरावर डाग असतात. गिर गायीची जात एका दिवसात सुमारे पन्नास लिटर दूध देत असते. यामुळे गाईचे संगोपन करणारे अनेक पशुपालक शेतकरी या गाईला विशेष पसंती दर्शवित असतात. या गाईचे संगोपन देखील भारतात अनेक ठिकाणी केले जाते.

लाल सिंधी (Lal Sindhi Cow)
लाल सिंधी ह्या गाईबद्दल बोलायचे झाले तर ही गाय मूळची पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जात असल्याचा दावा केला जातो. असे असले तरी भारतात ही गाय उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळते.

या जातीची गाय गडद लाल रंगाची असते. या गाईचा चेहरा रुंद असून शिंगे जाड व लहान असतात. या गाईची कास इतर सर्व जातींच्या गायींपेक्षा लांब असते.

जाणकार लोकांच्या मते, ही गाय दरवर्षी 2000 ते 3000 लिटर दूध देत असते. यामुळे निश्चितच पशुपालक शेतकऱ्यांसाठी या जातीचे संगोपन करणे फायद्याचे ठरत असते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts