अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीची सातबारा उताऱ्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी राहता येथील मंडल अधिकाऱ्याने 3 लाखांची मागणी केली होती.
त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहाता येथील मंडलअधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास 2 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता येथील तक्रारदाराच्या वडिलांनी खरेदी केलेल्या
शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी मुंडला अधिकारी भालेकर याने तीन लाख रुपयांची मागणी केली होती.
त्यातील २ लाख रुपये तत्काळ व उर्वरित १ लाख रुपये आठ दिवसांनी द्यावेत, अशी त्याची मागणी होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडे तक्रार देण्यात आली होती.
मंगळवारी पथकाने राहाता येथे सापळा लावून भालेकर याला तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच घेताना पंच, साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडले.