Best Recharge Plan : BSNL चा आला सर्वात स्वस्त प्लॅन, फक्त ‘हे’ एक रिचार्ज करा, वर्षभर चालेल कार्ड

BSNL Recharge Plan : सध्या मार्केटमध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यसाठीच एकापेक्षा एक सरस प्लॅन आणत असतात. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी कमी किंमतीत चांगले फायदे देणारा प्लॅन आणला आहे.

जो एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या खासगी कंपन्यांशी स्पर्धा करेल. एखादी कंपनी 797 रुपये खर्च करून 300 दिवसांची वैधता देऊ शकते असा विचार तुम्ही कधी केला नसेल, पण आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्लॅन घेऊन आलो आहोत. काय आहेत या प्लॅनचे फायदे, जाणून घेऊयात –

797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान

बीएसएनएलच्या या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये 797 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर युजर्संना दररोज 2 जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता एक वर्षाची आहे. म्हणजेच 365 दिवसांसाठी तुम्हाला दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे.

प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. दररोज मिळणाऱ्या 2 जीबी डेटा संपल्यानंतरही 80 केबीपीएस च्या स्पीडवर फ्री डेटा मिळतो. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे विनामूल्य फायदे केवळ पहिल्या 60 दिवसांसाठी वैध आहेत.

अनलिमिटेड कॉलिंग

797 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये तुम्ही लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलही करू शकता. तुम्ही इतर कोणत्याही नेटवर्कवर तसेच बीएसएनएल टू बीएसएनएल कॉल करू शकता. या संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी एकूण 730 जीबी डेटा,

दररोज 100SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते, जी इतर कोणत्याही कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनपेक्षा जवळपास 4 पट स्वस्त आहे. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर बीएसएनएलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

खरं तर या प्लानमध्ये मिळणारे फ्री फीचर्स फक्त पहिल्या 60 दिवसांसाठीच असतात. त्यानंतर व्हॉईस कॉलिंग/डेटा/एसएमएस बेनिफिट्स हवे असतील तर बीएसएनएलकडून वेगळे खरेदी करावे लागतील. या प्लॅनमध्ये तुमचे सिम 300 दिवस ऍक्टिव्ह राहील.

1198 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन :

बीएसएनएलच्या 1198 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स मिळतात. खरं तर बीएसएनएलचा हा प्लॅन एक सर्वांगीण प्लॅन देखील म्हणता येईल. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे.

या योजनेत मासिक खर्च सुमारे 100 रुपये येईल. या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे महिन्यानुसार विभागले जातात. या प्लॅनमध्ये दरमहा 300 मिनिटे कॉलिंग, दरमहा 3 जीबी हायस्पीड डेटा, 30 एसएमएस मिळतात. हे बेनिफिट्स बीएसएनएलच्या ग्राहकांना दरमहा वर्षातील बाराही महिने मिळतील.

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे :

अतिरिक्त वैधता असलेला हा प्लॅन सध्या BSNL च्या मर्यादित ऑफरवर आहे. ठराविक कालावधीनंतर बीएसएनएल ही ऑफर काढून टाकेल. मात्र, ही ऑफर किती दिवस चालेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts