BSNL Recharge Plan : भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी टेलीकॉम कंपनी आहे. BSNL कडे आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनेक शानदार रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ही कंपनी सतत रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाला कडवी टक्कर देत आहे.
स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. कंपनीचा असाच एक शानदार प्लॅन आहे ज्याची वैधता 65 दिवसांची आहे. कंपनीच्या या प्लॅनची किंमत 319 रुपये इतकी आहे. हे लक्षात घ्या कंपनीचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे.
बीएसएनएलच्या या प्लॅनची किती आहे किंमत
बीएसएनएलचा हा प्लॅन 319 रुपयांच्या व्हॉईस पॅकसह येतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 65 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. दिल्ली आणि मुंबई MTNL रोमिंग सर्कलसह ते अमर्यादित कॉलिंग आणि राष्ट्रीय रोमिंग ऑफर करत आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 10GB डेटा आणि 300SMS एकूण 65 दिवसांसाठी उपलब्ध आहेत.
म्हणजेच या प्लॅनमध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता उपलब्ध असून 4G किंवा 2G/3G स्थानावर असलेल्यांसाठी सर्वात उत्तम आहे. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी सर्वोत्तम आहे, ज्यांना जास्तीत जास्त दिवसांची वैधता हवी आहे.
डेटा बेनिफिट कमी करून बीएसएनएल टॅरिफ वाढवत असून कंपनीने त्याच्या सर्वात लोकप्रिय नाईट अनलिमिटेड रु 599 प्रीपेड प्लॅनवरील डेटा लाभ 5GB प्रति दिन वरून 3GB प्रतिदिन कमी करण्यात येत आहे, तसेच हे लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये इतर सर्व फायदे समान ठेवले आहेत.