ताज्या बातम्या

Best Smartphone under 12000 : बजेट कमी आहे? तरीही खरेदी करू शकता जबरदस्त फीचर्स असणारे हे स्मार्टफोन

Best Smartphone under 12000 : तुमचे आता स्वस्तात पण चांगले फीचर्स असणारा स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जर तुमचे बजेट 12000 रुपयांपेक्षा कमी असेल तर काळजीचे कारण नाही. 

कारण फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवर तुम्ही 12000 रुपयांपेक्षा कमी पैशात एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये Realme, सॅमसंग सारख्या स्मार्टफोन कंपन्यांचा समावेश आहे. पाहुयात लिस्ट.

1. Realme C35

तुम्ही आता 12000 च्या बजेटमध्ये Realme C35 खरेदी करू शकता. त्याच्या बेस व्हेरिएंट 4GB RAM + 64GB स्टोरेजची किंमत 11,999 रुपये असून यात कंपनीने 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये Unisoc T616 प्रोसेसर आहे. फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवरून खरेदी करून त्यावर उपलब्ध असलेल्या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

2. सॅमसंग गॅलेक्सी F13

हा देखील स्मार्टफोन तुम्ही 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. 6 GB रॅम 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.60-इंचाचा डिस्प्ले, Exynos 850 प्रोसेसर आणि 6000mAh बॅटरी तसेच  50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तुम्ही Amazon किंवा Flipkart वरून विकत घेऊ शकता.

3. लावा ब्लेझ 5G

या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे. तुम्ही बँक कार्ड किंवा इतर ऑफरद्वारे Amazon वरून स्वस्तात फोन खरेदी करू शकाल. तो ब्लू आणि ग्लास ग्रीन या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यात HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये Mali G57 GPU सह MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी दिली आहे.

4. Poco M5

हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट किंवा Amazon वर डिस्काउंटसह उपलब्ध असून किंमत 12 हजारांपेक्षा कमी आहे. फोन 6GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज (512GB पर्यंत वाढवता येणारा स्टोरेज) पॅक करतो. यामध्ये 6.58-इंचाचा डिस्प्ले, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टिम आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts