WCL Recruitment 2022: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. WCL ने 1,216 शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार 22 नोव्हेंबर 2022 रोजी अधिकृत वेबसाइट www.westerncoal.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
वय श्रेणी –
WCL 1,216 शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. त्याच वेळी कमाल वय 25 वर्षांपर्यंत असावे.
कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत –
WCL ने ITI पास अप्रेंटिससाठी 840, सुरक्षा रक्षकांसाठी 60, पदवीधर शिकाऊ उमेदवारासाठी 101, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवारासाठी 215 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे पूर्णवेळ BE किंवा B.Tech पदवी असावी, तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून खाणकामात डिप्लोमा केलेला असावा. तसेच शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय सुरक्षा रक्षक पदासाठी फक्त 10वी पास आवश्यक आहे.
निवड कशी होईल?
अधिसूचनेनुसार, या पदांवर उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचनेवर जाऊन माहिती तपासू शकता.