Business Idea : अनेकांना घरी बसून व्यवसाय सुरु करायचा असतो परंतु त्यांना कोणता व्यवसाय सुरु करायचा? त्यात किती नफा मिळेल? यांसारखे अनेक प्रश्न पडतात. त्यांच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या मसाल्याचा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला खूप पैसे कमावता येतील.
या जमिनीवर करा लागवड
लसूण लागवडीसाठी चिकणमाती सर्वात चांगली माती आहे. परंतु हे लक्षात ठेवा की याच्या पेरणीपूर्वी शेतात ओलावा आहे की नाही हे तपासा. जर ओलावा नसेल तर शेताला एकदाच पाणी द्या, ज्यामुळे जमिनीला योग्य ओलावा मिळेल. सपाट बेड तयार करून लसूण रोपाची पुनर्लावणी करा. या दरम्यान शेतात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था जरुर ठेवा. तसेच सतत पाणी देत राहा.
अशी करा लागवड
आता लसूण केव्हा खोदायचा हे त्याच्या पानांवरून तुम्हाला समजू शकते. जेव्हा पानांचा रंग पिवळा होतो आणि पाने गळू लागतात तेव्हा लसूण खणायला सुरुवात करा. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर, लसूण अशा ठिकाणी ठेवा ज्याठिकाणी सूर्यप्रकाश नाही, त्यानंतर, कंदांपासून पाने वेगळी करण्याची प्रक्रिया सुरु करा.
कमवाल बंपर उत्पन्न
जर आपण एक बिघा जमिनीवर लसणाची लागवड केल्यास आपण 7-8 क्विंटल लसूण काढू शकता. मंडईत लसणाच्या दरात चढ आणि उतार सुरूच असतात. त्याची सरासरी किंमत 100-120 रुपये इतकी असते. मंडईत लसणाचे भाव स्थिर राहिले तर एक एकर शेती करूनही लाखोंचा नफा शेतकरी सहज कमवू शकतो.