ताज्या बातम्या

Business Idea: दिवसाला 4 ते 5 हजार रुपये कमवायची इच्छा आहे का? तर सुरू करा हा व्यवसाय, होईल फायदा

शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागणे म्हणजेच आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण उध्वस्त करण्यासारखे आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, शिक्षणाच्या मानाने म्हणजे दरवर्षी पदवी घेऊन महाविद्यालयांच्या बाहेर निघणाऱ्या तरुण-तरुणींच्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांची संख्या अत्यंत अल्प आहे.

त्यातल्या त्यात ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांच्या नोकऱ्या टिकतील याची शाश्वती अजिबात नाही. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता काहीतरी छोटा मोठा व्यवसाय निवडून तो व्यवसाय यशस्वी करणे खूप महत्त्वाचे आहे.

या दृष्टिकोनातून जर आपण व्यवसायांचा विचार केला तर अनेक प्रकारचे व्यवसाय असून त्याची भली मोठी यादी तयार होईल. यामधून आपल्या परिसरातील बाजारपेठ, त्या ठिकाणाची मागणी तसेच आपली आर्थिक क्षमता पाहून व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे आहे.

अगदी याच पद्धतीने जर आपण विचार केला तर कमीत कमी गुंतवणुकीमध्ये चांगला आर्थिक परतावा देणारा व्यवसायाची निवड आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये कमी गुंतवणुकीत चांगला नफा देणाऱ्या व्यवसायाची माहिती घेणार आहोत.

कॉर्न फ्लेक्स बनवा आणि महिन्याला कमवा लाखो रुपये

कॉर्न फ्लेक्स म्हणजेच मक्याचे वेफर्स आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. कॉर्न फ्लेक्स बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला नक्कीच लखपती करू शकतो इतकी क्षमता याच्यामध्ये आहे.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील या कॉर्न फ्लेक्स अर्थात मक्याच्या वेफर्सचे महत्व अनन्यसाधारणा असून बरेच हॉटेल आणि घरांमध्ये सकाळच्या नाश्ता म्हणून याचा वापर केला जातो.

हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला प्लांट लावण्यासाठी जागेची आवश्यकता भासेल. तसेच मालाची साठवणूक करण्यासाठी तुम्हाला जागा लागेल.

म्हणून सुरुवातीला तुमच्याकडे 2 ते तीन हजार स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे. तसेच वीज, आवश्यक जीएसटी नंबर, त्याकरता लागणारा कच्चामाल या बाबी देखील महत्त्वाचे आहेत.

कॉर्नफ्लेक्स बनवण्यासाठी लागणारी यंत्रे

कॉर्न फ्लेक्स व्यवसायामध्ये ज्या मशिनीचा वापर तुम्ही कराल त्यापासून तुम्हाला गहू आणि तांदळाचे फ्लेक्स देखील तयार करता येतात. त्यामुळे या व्यवसायामध्ये वापरण्यात येत असलेल्या यंत्रांचा दुहेरी फायदा होतो.

ज्या क्षेत्रामध्ये मक्याची लागवड जास्त प्रमाणात होते अशा ठिकाणी हा व्यवसाय सुरू करणे हितावह ठरू शकते. जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी मक्याचे उत्पादन जास्त होते अशा परिसरामध्ये कॉर्न फ्लेक्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरते.

कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी किती येतो खर्च?

याबाबतीत आपण अनेक मीडिया रिपोर्ट किंवा इतर ठिकाणची माहिती पाहिली तर त्या माहितीनुसार एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी साधारणपणे 30 रुपये खर्च येतो. परंतु तयार कॉर्न फ्लेक्स बाजारामध्ये 70 रुपये किलो दराने विकले जाते.

समजा तुम्ही एका दिवसाला शंभर किलो कॉर्न फ्लेक्स अर्थात मक्याचे वेफर्स विकले तर एका दिवसात तुम्हाला चार हजार रुपये नफा होऊ शकतो. या पद्धतीने जर गणित पकडले तर महिन्यामध्ये साधारणपणे एक लाख ते एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत चांगली कमाई या माध्यमातून मिळू शकते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी करावी लागेल गुंतवणूक

कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बऱ्याच बाबींसाठी पैसा टाकणे गरजेचे असते. या दृष्टिकोनातून जर आपण कॉर्नफ्लेक्स व्यवसायाचा विचार केला तर सुरुवातीला कमीत कमी पाच ते आठ लाख रुपयांचे गुंतवणूक करणे गरजेचे असून

या गुंतवणुकीमध्ये उत्तमपणे तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता. तसेच शासनाच्या मुद्रा योजनेचा देखील यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकतात. एवढेच नाही तर स्टार्टअपसाठी असलेल्या अनेक सरकारी योजनांचा देखील तुम्ही लाभ घेऊन या माध्यमातून कर्ज मिळवू शकतात.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे 50 हजार रुपये स्वतःची गुंतवणूक आणि बाकीचा पैसा तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊन कर्ज स्वरूपात उभा करू शकता.तसेच या सगळ्या बाबींसोबत तुम्हाला लागेल जिद्द, चिकाटी, बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास आणि त्या दृष्टिकोनातून केलेले विक्री व्यवस्थापन हे तुमच्या अंगीभूत गुण तुम्हाला हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी उपयोगी ठरतील.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts