ताज्या बातम्या

Business Idea : बारमाही चालणारा ‘हा’ व्यवसाय करून कमवा लाखो रुपये..! जाणून घ्या व्यवसायाबद्दल सविस्तर

Business Idea : जर तुम्ही व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुम्हाला दरमहा लाखो रुपये कमवून देणाऱ्या व्यवसायाबद्द्दल सांगणार आहे. हा बिजनेस मुरमुरा मेकिंग (Murmur making) आणि लाय बनवण्याचा आहे.

पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये (West Bengal, Bihar and Jharkhand) झाल मुर्ही म्हणून मुरमुरा म्हणजेच लाइला अधिक पसंती दिली जाते.

खर्च किती येतो?

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत मुरमुरा उत्पादन युनिट स्थापन (Establishment of Murmura Manufacturing Unit) करण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्प अहवालानुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 3.55 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसल्यास, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले जाऊ शकते. तुम्ही प्रकल्पाच्या खर्चावर आधारित कर्जासाठी अर्ज करू शकता.

मुरमुरा म्हणजेच लायचा खप देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. मंदिरात प्रसाद म्हणूनही त्याचा वापर केला जातो. एवढेच नाही तर त्याचा वापर स्ट्रीट फूड म्हणूनही केला जातो.

मुरमुरा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल

मुरमुरा बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य कच्चा माल म्हणजे भात किंवा तांदूळ. हा कच्चा माल तुमच्या जवळच्या शहरात किंवा गावात सहज उपलब्ध होईल. तुम्ही तुमच्या जवळच्या धान बाजारातून घाऊक दराने देखील खरेदी करू शकता.

परवाना

मुरमुरा किंवा लाय बनवणे हे खाद्यपदार्थांच्या अंतर्गत येते. त्यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) कडून फूड लायसन्स घेणे आवश्यक आहे.

याशिवाय, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नाव देखील निवडू शकता. त्या नावावर व्यवसायाची नोंदणी आणि जीएसटीची नोंदणी देखील करावी लागेल. तुम्ही तुमच्या कंपनीच्या ब्रँड नावाचा लोगोही पॅकेटवर छापून घेऊ शकता.

कमाई किती होईल?

मुरमुरा किंवा लाय तयार करण्यासाठी 10 ते 20 रुपये प्रति किलो खर्च येतो. किरकोळ दुकानदार 40 ते 45 रुपयांना विकतात. तुम्ही ते 30-35 रुपये प्रति किलो या घाऊक दराने विकू शकता. किरकोळ विक्री करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. एकूणच या व्यवसायातून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts