Business Idea : जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही कमी खर्चात संपूर्ण वर्षभर चालणारे व्यवसाय सुरु करू शकता. ज्यातून तुम्हाला खूप फायदा होईल. कोणते आहेत हे व्यवसाय? जाणून घ्या.
क्रिएटिव्ह कार्ड मेकिंग- लग्न, पार्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी लोकांना कार्डची गरज असते. तुम्ही चांगले क्रिएटिव्ह बनवले आणि त्यांची विक्री सुरू केल्यास तुम्ही त्यातून चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुम्ही कला आणि हस्तकलामध्ये पारंगत असावे.
डान्स-म्युझिक क्लास- समजा तुम्ही गायन, नृत्य किंवा वादन यात पारंगत असल्यास तुम्हाला घरी बसून सहजपणे चांगली कमाई करता येईल. तुम्ही तुमच्या घरातच नृत्य आणि संगीताचे क्लास चालू करू शकता. पालकांना आपल्या मुलांची अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रात प्रगती पहायची असते, त्यामुळे त्यांना संगीत, नृत्याचे प्रशिक्षण देण्यात येते.
बुटीक आणि टेलरिंग – हे काम महिलांसाठी सर्वात फायदेशीर आहे परंतु फक्त हे काम महिलांनीच करावे असे नाही. तुम्हाला तुमच्या परिसरात अनेक शिंपी पुरुष पाहायला मिळतील. टेलरिंग व्यवसायासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नसून तुम्हाला दुकान भाड्याने देण्याची गरज भासणार नाही. हे काम तुम्ही घरी बसून मशीनने चालू करू शकता.
बेकरी- या व्यवसायात थोडी गुंतवणूक करावी लागणार आहे. सध्या बेकरीची मागणी खूप आहे, परंतु त्यासाठी काही भांडवल गरजेचे आहे. हे काम तुम्ही घरीबसुन चालू करू शकता परंतु काही काळानंतर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेतरी दुकान लावावे लागणार आहे. तुम्ही या व्यवसायात प्रगती करू शकता.
केटरिंग आणि फूड बिझनेस- समजा तुम्ही कोचिंग सेंटर्स किंवा कॉलेजेस असणाऱ्या भागात राहत असल्यास तर तिथल्या विद्यार्थ्यांना होम स्टाइल फूड देऊन तुम्हाला चांगले पैसे कमवता येईल. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर तुम्ही विवाहसोहळा आणि पार्ट्यांसाठी अल्प प्रमाणात केटरिंगचे काम चालू असते. त्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.