Business Idea : जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुम्हाला कोणता व्यवसाय सुरु करावा ते समजत नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण सध्या असा एक व्यवसाय आहे जो तुम्हाला हजारोंची कमाई करून देईल.
त्यासाठी तुम्हाला एक मशीन गरजेचे असणार आहे. बाजारात या मशीनची किंमत 70 हजार रुपये इतकी आहे. हे मशीन बसवून दरमहा 40 ते 50 हजार रुपये आरामात कमावू शकता. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.
किती करावी लागेल गुंतवणूक?
आता तुम्हाला टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, एकूण 70,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही इतकी रक्कम गुंतवली तर तुम्ही प्रत्येक महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांची कमाई करू शकता. टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी कच्चा माल म्हणून प्रिंटर, संगणक, हीट प्रेस, कागद आणि टी-शर्टची गरज असणार आहे. समजा तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु करायचा असल्यास तर तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. सर्वात स्वस्त म्हणजे मॅन्युअल मशीन, जे एका मिनिटात एक टी-शर्ट सहज तयार करते.
ऑनलाइन करता येईल विक्री
तुम्ही टी-शर्ट प्रिंट करून त्याची ऑनलाइन विक्री करू शकता. अलीकडच्या काळात ऑनलाइन व्यवसाय वेगाने वाढत असून अनेकजण त्याद्वारे मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. या व्यवसायाची स्थापना झाल्यास हळूहळू त्याचा आकार वाढू शकेल. त्यानंतर तुम्ही एक मशीन खरेदी करू शकता जे उत्तम दर्जाचे आणि मोठ्या संख्येने टी-शर्ट प्रिंट करेल.
तसेच तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला सोशल मीडिया कॅम्पेनची मदत घेता येईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिराती चालवता येतील. तसेच रील्स आणि व्हिडीओच्या मदतीने ते लोकांमध्ये लोकप्रिय करता येईल.
जाणून घ्या खर्च आणि बचत
किमतीचा विचार केला तर कपड्यांसाठी सामान्य प्रिंटिंग मशीनची किंमत 50,000 रुपये इतकी आहे. तर छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य दर्जाच्या टी-शर्टची किंमत 120 रुपये इतकी असणार आहे. त्याशिवाय टी-शर्टची छपाईची किंमत 1 ते 10 रुपयांपर्यंत असणार आहे.
समजा तुम्हाला छपाईचा दर्जा सुधारायचा असल्यास त्यासाठी 20 ते 30 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. समजा तुम्ही टी-शर्टमध्ये 150 रुपये गुंतवल्यास तुम्ही त्याची 250 रुपयांना सहज विक्री करू शकता. जर कोणी मध्यस्थ नसेल तर, तुम्ही एका टी-शर्टवर कमीत कमी 50 टक्के सहज कमवू शकता.