Business Idea : जर तुम्हाला चांगली कमाईची करण्याची संधी पाहिजे असेल तर आता तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण सध्या अशी एक उत्तम व्यवसाय कल्पना आहे, जी तुमचे आयुष्य पूर्ण बदलू शकते. हे लक्षात घ्या की हा व्यवसाय कृषी क्षेत्राशी निगडित आहे.
तुम्ही आता तागाची शेती करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल तर आता केंद्र सरकार तुम्हाला मदत करत आहे. याची मागणी भारतात आणि परदेशात जास्त मागणी आहे.
मागील काही वर्षांत, सर्वात उपयुक्त नैसर्गिक तंतू म्हणून ताग उदयास आला आहे. याची पेरणी गहू आणि मोहरीच्या काढणीनंतर मार्च ते एप्रिल दरम्यान करण्यात येते. अशातच आता तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावेळी तागाचे पीक लावून बक्कळ पैसा कमावू शकता.
या राज्यांमध्ये करण्यात येते तागाची लागवड
सर्वात महत्त्वाचे देशातील माती आणि हवामानानुसार काही विशेष पिके घेण्यात येतात. यात तागाच्या पिकाचाही समावेश आहे. पूर्व भारतात शेतकरी तागाची लागवड मोठ्या प्रमाणावर करत असतात. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओडिशा, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश आणि मेघालय हे प्रमुख ताग उत्पादक राज्यांच्या यादीत समावेश आहे.
देशातील सुमारे 100 जिल्ह्यांमध्ये हे पीकघेण्यात येते. केंद्र सरकारकडून तागाच्या किमतीत 6 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. जगातील ताग उत्पादनात एकट्या भारताचा वाटा 50 टक्के आहे. भारताशिवाय तागाचे उत्पादन बांगलादेश, चीन आणि थायलंडमध्ये होते.
उपयोग
ताग हे एक लांब, मऊ आणि चमकदार नगदी पीक आहे. त्याचे तंतू गोळा करून जाड धागा तयार करण्यात येतो. तुम्ही याच्या मदतीने पिशव्या, बोरे, गालिचे, पडदे, सजावटीच्या वस्तू, टोपल्या पॅकिंगसाठी तयार करू शकता. अन्नधान्य पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गोण्या फक्त तागापासून बनवण्यात येतात.
तागाच्या रोपापासून लगदा तयार करण्यात येतो. त्यातून कागद आणि खुर्च्या बनवल्या जातात. सध्याच्या काळात तागाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तुम्ही आता या पिकातून बंपर उत्पन्न मिळवू शकता.