Business Idea : जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता सरकारी मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. महिन्याला तुमची यातून 1.5 लाख रुपये सहज कमाई होईल.
दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही चांगल्या जातीच्या गायी आणि म्हशी विकत घ्याव्या लागणार आहेत. तसेच त्यांची काळजी आणि आहाराची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. याचा फायदा असा होईल की तुमची जनावरे बराच काळ निरोगी राहतील. दूध उत्पादन वाढू शकते.
असा सुरु करा हा व्यवसाय
तुम्ही सहज डेअरी फार्मिंग व्यवसाय चालू करू शकता. ज्या ठिकाणी दुधाला चांगली मागणी आहे, अशा ठिकाणी तुम्ही व्यवसाय सुरु केला तर त्याचा तूम्हाला फायदा होईल. तुम्ही म्हशी विकत घेताना हे लक्षात ठेवा मुर्रा जातीच्या म्हशीच खरेदी करा.
कारण त्या खूप चांगले दूध देतात. याचा फायदा असा होईल की अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन होऊ शकेल. गाई-म्हशींना बांधण्यासाठी पुरेशी जागा असावी हे लक्षात ठेवा. हे सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात कमी गायी किंवा म्हशींची निवड करा. मागणीनुसार जनावरांची संख्या वाढवा.
मिळेल अनुदान
दुग्ध व्यवसायासाठी सरकार 25 ते 50 टक्के अनुदान देत आहे. हे अनुदान राज्यानुसार बदलते हे लक्षात ठेवा. प्रत्येक राज्यात काही दूध सहकारी संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून उत्पन्न वाढवण्यास मदत करत आहेत. तुम्हालाही दुग्धव्यवसाय करायचा असल्यास तुमच्या राज्यातील दूध सहकारी संस्थेशी संपर्क साधा.
कमाई
समजा तुम्हाला 10 गायींपासून 100 लीटर मिळाल्यास तुम्ही तर दूध कसे विकता यावर तुमचा नफा अवलंबून असणार आहे हे लक्षात ठेवा. सरकारी डेअरीमध्ये दूध विकले तर लिटरमागे 40 रुपये दर मिळतील. थेट खाजगी दुकानात किंवा जवळपासच्या शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये विक्री केली तर तुम्हाला प्रति लिटर 60 रुपयांपर्यंत दर मिळतील. दोन्हीची सरासरी घेतल्यास तर तुम्ही 50 रुपये लिटरने दूध विकू शकता. 100 लिटर दूध म्हणजे तुमचे रोजचे उत्पन्न 5000 रुपये आणि महिन्याला 1.5 लाख रुपये सहज कमाई होईल.