आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यवसायात जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. सध्या स्टार्टअप सुरु करण्यासाठी बहुतांश तरुण धडपडत असतात. त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू केल्यास त्या व्यवसायात नक्कीच स्पर्धेला सामोरे जावे लागेल. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल कल्पना देणार आहोत कि जो स्पर्धात्मक आहे पण जास्त कॉम्पिटेटिव्ह नसेल.
अतिशय कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय आहे जॅम, जेली आणि मुरब्बा
तयार करण्याचा बिझनेस. या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे प्रत्येक हंगामात याला मागणी असते. त्यामुळे तुम्ही हा बिझनेस प्रत्येक सीझनमध्ये करू शकता. जवळपास 80 हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
जाणून घ्या किती येईल खर्च:- खादी व ग्रामोद्योग आयोगाने याबाबतचा अहवाल तयार केला आहे. जॅम, जेली आणि मुरब्बा बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च येणार आहे. एक हजार चौरस फुटांचे बिल्डिंग शेड बांधण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च येणार आहेत. त्याचप्रमाणे मशीन खरेदी करण्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे. याशिवाय अंदाजे दीड लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटल असणार आहे. जर तुम्ही याची सुरुवात छोट्या स्वरूपात घरातल्या घरात केली तर 80,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात तुम्ही याची सुरुवात करू शकता.
असा सुरू करा व्यवसाय:-व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम फळांची गरज भासणार आहे. याचा उपयोग प्रोडक्ट तयार करण्यासाठी केला जाणार आहे. फळांमुळे जॅम आणि जेली स्वादिष्ट बनतात. याशिवाय तुम्हाला साखरेची ही गरज भासणार आहे. घरबसल्या हा व्यवसाय सुरु करता येतो. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना रोजगारही देऊ शकता.
मोठी कमाई कराल:-खादी व ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या अहवालानुसार जर काम केले तर – जर तुम्ही बजेट जास्त ठेवले तर साधारण 231 क्विंटल जॅम, जेली आणि मुरब्बा वर्षभरात तयार केला. यासाठी 2,200 रुपये प्रति क्विंटल असा खर्च आला. तर एकूण खर्च 5 लाखाच्या आसपास येईल. सेलनंतर तुमचे उत्पन्न जवळपास 7,10,640 रुपये होईल, म्हणजेच तुम्हाला जवळपास 2 लाखांच्या आसपास नफा मिळेल. अशा प्रकारे तुम्ही दरमहा 17 हजार रुपये कमवू शकता. हेच बजेट तुम्ही वाढवत गेलात तर महिन्याला लाखो रुपय तुम्ही कमावू शकता.
मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घ्या:- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मुद्रा लोन योजनेचा ही लाभ घेऊ शकता. तुम्हाला 7 लाखरुपयांपेक्षा जास्त कर्ज मिळू शकते. अत्यंत कमी व्याजदराने कर्ज मिळेल. तुमच्याकडे जागा असेल तर तुमचा खर्च आणखी कमी होईल.