ताज्या बातम्या

Business Ideas : कमी गुंतवणुकीत सुरु करा हे ५ भन्नाट व्यवसाय! मिळेल लाखोंचा नफा, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : आजकाल अनेकांना नोकरी न करता व्यवसाय करायचा असतो मात्र त्यांच्यासमोर भांडवलाचा प्रश्न समोर असतो. भांडवल नसल्याने अनेकांना व्यवसाय करणे शक्य होत नाही. मात्र असे काही व्यवसाय आहेत जे तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये देखील करू शकता.

तुम्हाला असे छोटे व्यवसाय करायचे असतील तर तुम्ही देखील तुमच्या घरापासून काही अंतरावर करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही कमी पैशांमध्ये देखील भन्नाट व्यवसाय सुरु करून लाखोंची कमाई करू शकता.

आजकाल अशी अनेक लोक आहेत ज्यांनी छोट्या व्यवसायातून सुरुवात करून मोठमोठे व्यवसाय स्थापित केले आहेत. तुम्ही देखील असे छोटे व्यवसाय सुरु करून दरमहा चांगली कमाई करू शकता.

1.योग प्रशिक्षक

सध्या देशामध्ये योगाचे महत्व वाढू लागले आहे. योग्य केल्याने शरीर निरोगी राहते तसेच तणावापासून अनेकजण मुक्त होत आहेत. मात्र अनेकांना योग शिकायचे असते. मात्र अनेकांना त्याबद्दल माहिती नसते. त्यामुळे योग प्रशिक्षकांना भारतातच नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे. तुम्ही देखील हा व्यवसाय सुरु करून चांगले पैसे कमवू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागणार नाही.

2. खनिज पाणी पुरवठादार

तुम्हालाही कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही खनिज पाणी पुरवठादार हा व्यवसाय सुरु करू शकता. सध्या या व्यवसायाला देखील खूप मागणी आहे. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या करू शकता. कारण तुम्ही पाणी बाटली पुरवण्यापूर्वी, फोनवरून ऑर्डर घेऊन बुकिंग घेऊ शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला २ लोक कामासाठी घ्यावे लागतील. कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही पहिल्या महिन्यापासूनच नफा कमवू शकता.

3. नाश्त्याचे दुकान

तुमच्याकडेही कमी भांडवल असेल तर तुम्ही नाश्त्याच्या दुकानाचा व्यवसाय करू शकता. सध्या अनेकांना घरी बसून नाश्ता करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे अनेकजण बाहेर जाऊन नाश्ता करत असतात.

२५ ते ३० हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही छोटेसे नाश्त्याचे करू शकता. हे दुकान सुरु कारण्यासाठी तुम्हाला एक योग्य प्रकारची जागा शोधावी लागेल. त्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायातून तुम्ही देखील चांगला नफा कमवू शकता.

4. मोबाईल दुरुस्ती

आजकाल सर्वच ठिकाणी स्मार्टफोनचे प्रमाण वाढू लागले आहे. भारतात सुमारे 800 दशलक्ष मोबाइल फोन वापरकर्ते आहेत. तुम्हाला छोटासा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही मोबाईल दुरुस्तीचा छोटा वुवसाय सुरु करून चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला कोर्स करावा लागेल.

5. खत आणि बियाणे स्टोअर

सध्या शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून तुम्ही कमी पैशामध्ये खेड्यामध्ये खते आणि बियाणांचे दुकान सुरु करू शकता. हे दुकान सुरु करून तुम्ही देखील चांगली कमाई करू शकता.

Renuka Pawar

Recent Posts