ताज्या बातम्या

Honda Electric Scooter : ‘ही’ Honda इलेक्ट्रिक बाइक फक्त Rs.18,330 मध्ये खरेदी करा

Honda Electric Scooter: पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel prices) सतत गगनाला भिडतात त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicles) मागणीही वाढू लागली आहे. आजकाल बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooters) आणि इलेक्ट्रिक कारना (electric cars) खूप मागणी आहे.

लोक आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळू लागले आहेत. ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन वाहन निर्मातेही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत.

इतर कंपन्यासुद्धा त्यांचे जुने मॉडेल (Activa Old Model) लाँच करत आहेत आणि त्याचे इलेक्ट्रिक अवतारात रूपांतर करत आहेत. अलीकडे तुम्ही स्प्लेंडर आणि हिरो एचएफ डिलक्स बाइकच्या  (Hero HF Deluxe Bike

) इलेक्ट्रिक वर्जन देखील पाहिल्या आहेत.

आजच्या बातम्यांमध्ये आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक होंडा अ‍ॅक्टिव्हाबद्दल ( Honda Activa ) सांगणार आहोत. नुकतेच एका खासगी कंपनीने होंडा अ‍ॅक्टिव्हासाठी इलेक्ट्रिक किटही तयार केले आहे. या किटसह तुम्ही तुमची जुनी Honda Activa इलेक्ट्रिक अवतारात बदलू शकता.  यासाठी तुम्हाला फक्त 18330 रुपये खर्च करावे लागतील

अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक किट 
GoGoA1 ही कंपनी, जी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट देखील बनवते. हिरो स्प्लेंडरसाठी रूपांतरण किट तयार केल्यानंतर, आम्ही आता होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरसाठी इलेक्ट्रिक किट विकसित केले आहे. हे इलेक्ट्रिक किट बसवल्यानंतर तुम्हाला 3 वर्षांपर्यंत एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. म्हणजे 3 वर्षे नो टेन्शन Hero Splendor ची इलेक्ट्रिक वर्जन देखील खूप पसंत केली जात आहे.  आता Honda Activa चा इलेक्ट्रिक अवतार लोकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.

honda activa ची  किंमत


GoGoA1 कंपनीद्वारे निर्मित, हे इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तुमच्या स्कूटरला हायब्रिड आणि संपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बदलू शकते.  Honda Activa Hybrid Electric Kit ची किंमत रु. 18330. जीएसटी नंतर 23000 रुपये होईल.

इलेक्ट्रिक होंडा अॅक्टिव्हारेंज 
कंपनीने  या इलेक्ट्रिक किटमध्ये 60 व्होल्ट आणि 1200 वॅट पॉवर दिली आहे. यासोबतच त्यात बीएलडीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच ही मोटार जुन्या अ‍ॅक्टिव्हामध्येच वापरता येणार आहे. या इलेक्ट्रिक किटमध्ये तुम्हाला 72 व्होल्टचा 30 Ah बॅटरी पॅक दिला जाईल. या बॅटरीची किंमत 35 ते 40 हजार रुपये सांगितली जात आहे . कंपनीचा दावा आहे की  एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 100 किमीची रेंज देईल. 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts