ताज्या बातम्या

MOTOROLA G51 5G : 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा मोटोचा हा स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर

MOTOROLA G51 5G : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला 5G स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्ही आता कमी किमतीत मोटोचा MOTOROLA G51 हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता.

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले आहेत. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जावे लागेल. कारण तेथे सेलदरम्यान तुम्ही तो खरेदी करू शकता.

अशी आहे किंमत आणि ऑफर

जर ऑफर्सबद्दल बोलायचे तर, हा फोन फ्लिपकार्टवर 17,999 रुपयांच्या किमतीत दिसून आला आहे. यावर 16 टक्के सूट मिळाल्यानंतर तो 14,999 मध्ये सूचीबद्ध आहे. तर दुसरीकडे, बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनवर फेडरल बँक आणि HSBC बँक क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट मिळत आहे.

Flipkart Axis कार्ड वरून 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. जुना फोन एक्सचेंज करायचा असेल आणि जुन्या फोनची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी, तुम्ही फ्लिपकार्ट वेबसाइटला भेट द्या.

स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

या फोनमध्ये 6.8-इंचाचा मोठा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळत आहे. जो 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 Pro चा प्रोसेसर दिला आहे. यात 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज मिळते. ते तुम्ही मायक्रो एसडी कार्डने वाढवू शकता.

बॅटरी आणि कॅमेरा कशी असणार

यामध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. तर या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा उपलब्ध आहे. यासोबतच 8 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फोनच्या समोर 13-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असणार आहे.

सुरु सुरू होणार सीरिज

या नवीन वर्षात मोटोरोला कंपनी दोन नवीन जी सीरीज फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ज्याचे नाव Moto G53 5G (Moto G53 5G) आणि दुसरे Moto G73 5G (Moto G73 5G) आहे. नुकतेच कंपनीने चीनमध्ये G53 5G लॉन्च केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts