Bank Rules : जवळपास सगळ्यांचे बँकेत खाते असते. जर तुमचेही बँकेत खाते असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकांना बँकेत खाते असूनही त्यांच्या नियमाची माहिती नसते. त्यामुळे त्यांना मिळत असलेल्या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
तसेच त्यांच्याकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे त्यांना आर्थिक दंड भरावा लागतो. अनेकांना बंद असलेल्या बँक खात्यातून पैसे काढता येतात का असा प्रश्न पडतो? जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर जाणून घेऊयात.
समजा एखाद्या ग्राहकाने त्याच्या बँक खात्यात दोन वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला नसेल तर त्याचे खाते निष्क्रिय केले जाते.
कोणत्याही प्रकारचे बचत, FD, RD, चालू खाते असो. ते, खाते पुढील 8 वर्षे निष्क्रिय राहते. तसेच त्या खात्यात जमा केलेली रक्कम दावा न केलेली रक्कम मानली जाते.
समजा जर तुमचे खाते निष्क्रिय केले गेले असेल तर तुम्ही तुमच्या बंद असलेल्या बँक खात्यातून सहज पैसे काढू शकता.
बँक खातेदाराच्या मृत्यू झाल्यानंतर, नॉमिनी त्याचा आयडी पुरावा दाखवून त्याच्या खात्यात जमा झालेल्या पैशावर दावा करतो. ज्यामध्ये खातेदाराने नामनिर्देशित व्यक्तीचे नाव जोडलेले नसेल तर तुम्ही उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखवून त्या पैशावर दावा करू शकता.