ताज्या बातम्या

Train Ticket Cancellation Charges : ट्रेनचे तिकीट रद्द करताय? तर जाणून घ्या ‘हे’ नियम, नाहीतर होईल तुमचे मोठे आर्थिक नुकसान

Train Ticket Cancellation Charges : इतर वाहनांपेक्षा रेल्वेचा प्रवास हा खूप कमी खर्चिक असतो. इतकेच नाही तर रेलवेच्या प्रवासामुळे वेळ वाचला जातो, त्यामुळे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे अनेक सुविधा आणत असते.

तसेच काही नियमही रेल्वेने कडक केले आहेत. ज्यांची काही प्रवाशांना कसलीच माहिती नसते. प्रवासासाठी अनेकजण तिकीट प्लॅटफॉर्मवर खरेदी करतात ते काहीजण तिकीट ऑनलाईन बुक करतात. परंतु, अनेकजण रेल्वेचे तिकीट अचानक रद्द करतात. तिकीट रद्द करण्यापूर्वी रेल्वेचे नियम जाणून घ्या.

चार्ट बनवण्याअगोदर किती पैसे कापले आहे ते पहा?

जर तुम्ही 48 तासांपूर्वी तिकीट रद्द केले तर, फर्स्ट/एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी रु.240, एसी 2 टियर/फर्स्ट क्लाससाठी रु. 200, एसी 3 टियर/एसी चेअर कार/एसी 3 इकॉनॉमीसाठी रु. 180, स्लीपरसाठी रु. 180रद्द करण्याचा शुल्क 120 रुपये आणि द्वितीय श्रेणीसाठी 80 रुपये तुम्हाला मोजावे लागतील.

जर तुम्ही नियोजित सुटण्याच्या 12 तासांपूर्वी ट्रेनचे तिकीट रद्द केल्यास तुमचे रद्दीकरण शुल्क किमान फ्लॅट रेट भाड्याच्या 25% असणार आहे. तसेच हे लक्षात घ्या की 12 तासांपेक्षा कमी आणि 4 तास अगोदर, भाड्याच्या 50% रद्दीकरण शुल्क तुमच्याकडून आकारण्यात येणार आहे.

तत्काळ तिकिटावर किती रद्दीकरण शुल्क आकारला जाणार

जर तुम्ही कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट रद्द केले तर तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही हे लक्षात ठेवा.

तसेच दुसरीकडे, तुमचे प्रतीक्षा यादी असलेले तत्काळ तिकीट रद्द केले तर शुल्क कापले जाते. तर तत्काळ ई-तिकीटांचे आंशिक रद्द करण्याची परवानगी आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts