Cars Price Hike : बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी ऑटो कंपनी Hyundai चे तुम्ही देखील येणाऱ्या नवीन वर्षात कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो Hyundai ने एक मोठा निर्णय घेत आपल्या कार्सच्या किमतीमध्ये नवीन वर्षात वाढ करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे आता तुम्हाला Hyundai च्या कार्स खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. चला तर जाणून घ्या कोणत्या कार्स महागणार आहे.
किमती किती वाढणार?
ह्युंदाईच्या कोणत्या कारची किंमत किती वाढणार आहे, याची माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पण वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या किमतींमध्ये होणारी वाढ वेगळी असेल.
Hyundai च्या किमती वाढवण्याचे कारण काय?
ह्युंदाई इंडियानेही किमती वाढवण्याचे कारण दिले होते. कोरोनानंतर कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे वाहनांचा उत्पादन खर्चही पूर्वीपेक्षा वाढला आहे. याच कारणामुळे कंपनीने वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Hyundai कार घेणे महाग का होईल?
ह्युंदाई इंडियाकडून अलीकडेच माहिती देण्यात आली आहे की कंपनी भारतात आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. अशा परिस्थितीत लवकरच ह्युंदाई कार खरेदी करणे लोकांसाठी महाग होणार आहे.
भाव कधी वाढणार?
Hyundai India ने दिलेल्या माहितीत हे देखील सांगण्यात आले आहे की कंपनी भारतात आपल्या वाहनांच्या किमती कधीपासून वाढवणार आहे. वाढलेल्या किमती नवीन वर्षापासून म्हणजेच जानेवारी 2023 पासून लागू होतील.
हे पण वाचा :- Best SUV In India : भारतात सुपरहिट ठरले ‘ह्या’ SUV ! मिळतो 28km मायलेज; खरेदीसाठी जमत आहे लोकांची गर्दी