अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालयात नुकतेच चांदा गावातील युवकांच्या पुढाकारातून व सामाजिक संघटनेच्या वतीने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
त्यासाठी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने हळूहळू मदतीचा ओघ सुरु झाला आहे. चांदा येथील जवाहर विद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कोवीड सेंटरला पंचवीस हजार रुपयाची रोख मदत देण्यात आली. सध्या कोरोणाने राज्यात धुमाकूळ घातला असून, यामध्ये अनेक रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत.
खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक नसल्याने स्वयंसेवी संस्थांच्या वतीने गोवोगावी सुरु करण्यात आलेले कोवीड सेंटर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. चांदा येथील युवकांच्या पुढाकारातून सोमेश्वर कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
या कोविड सेंटरला माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक संतोष कानडे, आबासाहेब शेळके, संदीप जावळे, जितेंद्र शिंदे, सोपान चौधरी, प्रशांत शेटे, प्रवीण सावंत, राहुल दहातोंडे, प्रशांत बोरुडे, राजेंद्र क्षिरसागर, सोपान शेळके, धीरज मनोचा, प्रदीप दहातोंडे, अशोक जावळे यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत दिली.
सागर अनेचा, बबन विठ्ठल गवळी यांनी देखील कोवीड सेंटरसाठी वैयक्तिक आर्थिक मदत दिली. याप्रसंगी देविदास पासलकर, बाळासाहेब जावळे, पोलीस पाटील कैलास अभिनव, सुनील भगत, किरण जावळे, अमोल मरकड ,
सत्यानंद दिवटे, संतोष बोरुडे, सादिक शेख, बबलू काळुंगे, तुशार जोशी आदी उपस्थित होते. गावातील अनेक युवक अहोरात्र कोवीड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करीत आहे.