अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- शेवगावचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी आणि मूळ विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असणारे रामनाथ कराड आणि शेवगाव तालुक्यात कार्यरत असणारे केंद्र प्रमुख रामराव ढाकणे यांनी जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९७६ चा भंग केल्याने त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
तत्कालीन गटविकास अधिकारी कराड आणि केंद्र प्रमुख ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे मंजूर झाल्यानंतर ते विनापरवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून खागसी मालकीच्या जागेत बांधकाम केले.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचा पैसा वाया गेेला असून हा प्रकार जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९७६ चा भंग केल्याचा असल्याने
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांनी कराड आणि ढाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालावधीत या दोघांचे मुख्यालय हे नेवासा तालुका करण्यात आला आहे.