ताज्या बातम्या

Central Government : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! केंद्र सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; आता ..

Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा गुड न्युज मिळाली आहे. केंद्र सरकारने मोठा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी दिले जाणारे बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) च्या व्याज दर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता अनेक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी शासनाने कार्यालयीन निवेदनही दिले आहे.

80 बेसिस पॉइंट्सच्या व्याजदरात वाढ

या निर्णयाअंतर्गत, सरकारने 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत घर बांधण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी कर्मचार्‍यांना अॅडव्हान्ससाठी 80 बेसिस पॉइंट्सच्या व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजेच 0.8 टक्क्यांनी कपात केली आहे. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न आणखी सोपे होणार आहे. कर्मचारी आता 31 मार्च 2023 पर्यंत या व्याजदराचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हाला कोणत्या दराने अॅडव्हान्स मिळेल हे जाणून घ्या?

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कार्यालयीन ज्ञापन जारी केले असून अॅडव्हान्स व्याजदरात कपात करण्याबाबत माहिती दिली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर, कर्मचारी आता 31 मार्च 2023 पर्यंत वार्षिक 7.1 टक्के दराने अॅडव्हान्स घेऊ शकतात, जे पूर्वी वार्षिक 7.9 टक्के होते. सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आता स्वस्तात घरे बांधता येणार आहेत.

HBA म्हणजे काय ?

विशेष म्हणजे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स देते. यामध्ये कर्मचारी स्वत:च्या किंवा पत्नीच्या नावे असलेल्या भूखंडावर घर बांधण्यासाठी अॅडव्हान्स रक्कम घेऊ शकतो. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात आली होती आणि या अंतर्गत, 31 मार्च 2023 पर्यंत, केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांना 7.1% व्याज दराने घर बांधण्यासाठी अॅडव्हान्स देते.

किती अॅडव्हान्स घेऊ शकतो?

आता प्रश्न असा आहे की आपण किती अॅडव्हान्स घेऊ शकता? आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने दिलेल्या या विशेष सुविधेअंतर्गत केंद्रीय कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनानुसार 34 महिन्यांपर्यंत किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत दोन प्रकारे अॅडव्हान्स घेऊ शकतात. तसेच, घराची किंमत किंवा त्याची देय देण्याची क्षमता, कर्मचाऱ्यांसाठी यापैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम अॅडव्हान्स म्हणून घेतली जाऊ शकते.

हे पण वाचा :-  LIC Scheme: भारीच .. एलआयसीच्या ‘या’ भन्नाट योजनेत मिळणार 1 कोटी रुपयांचा लाभ ; जाणून घ्या कसं

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts