नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Goverment) देशातील तरुणांसाठी सैन्य दलात (Military) भरती होण्यासाठी एक नवी अग्निपथ योजना (Agneepath Yojana) आणली आहे. मात्र या योजनेला देशभरातून विरोध (Protest) होत आहे. अनेक राज्यात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. यावरूनच काँग्रेस नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) याने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
कन्हैया कुमार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मोदी सरकार आणि त्यांच्या योजनांवर सडकून टीका आणि विरोध केला आहे. ते म्हणाले, “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं.
अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या”, असं कन्हैय्या कुमारने यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करावं, असं कन्हैय्याने म्हटलंय. शिवाय बिहारमध्ये बेरोजगारी दर जास्त आहे”, त्यावर कामन होणं गरजेचं असल्याचंही कन्हैय्या कुमारने म्हटलं आहे.
यावेळी बोलताना कन्हैय्या कुमारने आंदोलकांनाही सल्ला दिला आहे. अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन होत आहे. यात सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ केली जात आहे.
त्याबाबतही कन्हैय्याने आंदोलकांना महत्नाचा सल्ला दिला आहे. “तरुणांनी देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, सत्य आणि अहिंसा मार्गाने तरुणांनी आंदोलन करावं”, असं कन्हैय्याने म्हटलंय.
देशातील अनेक राज्यात केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेला तरुण कडाडून विरोध करत आहेत. त्याचा वानवा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तरुणांकडून देशातील सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करण्यात येत आहे.