Ahmednagar News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी एका व्यक्तीने दूरध्वनीद्वारे दिली आहे. हा फोन अहमदनगरमधून केला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुख्य म्हणजे हा फोन राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात नव्हे तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात करण्यात आलेला आहे. आज दुपारी ही धमकी देण्यात आली. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन आला होता. याअगोदरही दोन वेळा चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले होते.