Chanakya Niti : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. त्यांची मुत्सद्दीपणा आणि अर्थशास्त्राचे महान जाणकार अशी ओळख आहे. अर्थशास्त्र, नाट्यशास्त्रासह त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. चाणक्य नीति या ग्रंथात त्यांनी जीवनाशी निगडित सर्व बाबींबद्दल सांगितले असून त्यांचे पुस्तक वाचून एखादी व्यक्ती यशाच्या मार्गावर चालायला लागते.
एखाद्या व्यक्तीने जर चाणक्य नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होऊन जाते. आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात असे सांगितले की काही परिस्थितीत स्त्रिया पुरुषांपेक्षा नेहमी पुढे असतात. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीनुसार महिला धैर्य, भूक, बुद्धिमत्ता आणि कामुकता यात पुरुषांपेक्षा पुढे आहेत. त्यांचा स्त्रिणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा, साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतॉः हा श्लोकात आचार्यांनी या श्लोकमध्ये स्त्रियांबद्दल वर्णन केले आहे.
या आहेत चार गोष्टी
जास्त भूक लागणे
आचार्य चाणक्यांच्या नीतीनुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांना खूप जास्त भूक लागते. कारण त्यांना दिवसभर मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागत असते. त्यामुळे असे मानले जाते की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त अन्न खात असतात.
जास्त हुशार आणि चतुर
तसेच आचार्य चाणक्य असे म्हणतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त हुशार आणि चतुर असतात. या महिलांचे मन स्पष्टपणे काम करत असते असे म्हटले जाते. इतकेच नाही तर या महिला कोणतेही काम नीटनेटकेपणे करतात.
8 पट जास्त कामुक
आचार्य चाणक्य पुढे असेही म्हणतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा 8 पट जास्त कामुक असून त्यांच्यात पुरुषांपेक्षा जास्त लैंगिक शक्ती असते. परंतु महिलांना लवकर व्यक्त होता येत नाही.
धैर्यवान आणि निर्भय
हे लक्षात घ्या की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धैर्यवान आणि निर्भय असतात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, धैर्याची शक्ती पुरुषांपेक्षा 6 पटीने जास्त असते.