Petrol Diesel Price : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ आणि उतार सुरूच आहेत. या नवीन वर्षातही कच्च्या तेलाच्या किमतीत चढ आणि उतार होऊ शकतात.
कोरोनाचे संकट आणि आर्थिक मंदी वाढत गेली तर त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे. अशातच आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या असून आजही किमतीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना सलग 221 व्या दिवशी दिलासा मिळाला आहे.
असे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव
मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कपात झाली आहे. सध्या WTI क्रूड प्रति बॅरल $79 आणि ब्रेंट क्रूड $84 प्रति बॅरल जवळ पोहोचले आहेत. जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले आहेत.
तेव्हापासून 46 टक्क्यांच्या घसरणीसह, ते प्रति बॅरल $76 च्या जवळ व्यापार करत आहे. या वर्षातील ही सगळ्यात कमी पातळी आहे. कच्च्या तेलाचा लीटर संदर्भात जर अंदाज लावला तर 9 महिन्यांत किंमत 33 रुपयांपेक्षा जास्त कमी झाली पाहिजे. परंतु, अजूनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या नाहीत.
यापूर्वी उत्पादन शुल्कात झाली होती कपात
सरकारने या अगोदर 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे.
त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होऊन देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली होती.
अशा आहेत महानगरांमधील किमती
दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दर आहे. तसेच मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तसेच कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर असून चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
येथे आहे सर्वात जास्त महाग पेट्रोल-डिझेल
राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.
येथे आहे सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात स्वस्त विकले जात आहे. येथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर तर डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
आजचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर.
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
म्हणून पेट्रोल-डिझेलच्या किमती जास्त
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जास्त होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलत असतात.
जाणून घ्या आजचे दर
पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज बदलून सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्हाला पेट्रोलआणि डिझेलचे दर एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तसेच HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किमती काय आहेत ते जाणून घेऊ शकता.