अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र काल मंगळवारी दि.८ पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले असून ४५० पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र आहे. यामध्ये बाळ बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या अन्य सहा जणांविरूद्ध दोषारोप ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याचा शोध घेतला आहे. तसेच आरोपी बोठे याला मदत करणाऱ्या २५ जणांचे जबाब काल दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात नोंदविण्यात आले आहेत.सामाजिक कार्यकत्र्या रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता.
त्यामुळे सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींविरूद्ध पारने रच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बोठे याला १०२ दिवसांनंतर हैदराबादमधील बिलालनगर परिसरातून अटक केली.
या अटकेला येत्या १० जून रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. आरोपी बाळ बोठे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला.