WhatsApp Feature : व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांना सतत नवनवीन फीचर्स देत आहे, त्यामुळे व्हॉट्सअपमध्ये त्यांची आवड निर्माण होत आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीला, व्हॉट्सअपने आपल्या वापरकर्त्यांना अनेक भन्नाट अपडेट दिले आहेत.
शातच आता व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांना आणखी एक अपडेट देणार आहे, ज्याची ते अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. आता या नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांना महत्वाचे संदेश पिन करता येणार आहे. हे फिचर कधी येणार? ते कसे काम करणार याची माहिती जाणून घेऊया.
महत्वाचे संदेश पिन करता येणार
एका अहवालानुसार, हे फिचर खूप फायदेशीर असून त्यामुळे वापरकर्त्यांना चॅटच्या शीर्षस्थानी महत्त्वाचे संदेश पिन करता येतील. जर संदेश पिन केलेला असेल आणि प्राप्तकर्ता अॅपची जुनी आवृत्ती वापरत असेल तर त्यांना अॅप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या नवीनतम आवृत्तीवर अपग्रेड करण्यास सांगणारा संदेश संभाषणात दिसून येईल.
लवकरच येणार अपडेट
पिन केलेले संदेश वापरकर्त्यांना महत्त्वाच्या संदेशांमध्ये सहज प्रवेश करून अनेक संदेश प्राप्त करणार्या गटांमधील संघटना सुधारतील. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हे फीचर अजून सर्व वापरकर्त्यांसाठी आणले नाही. लवकरच हे अपडेट सगळ्यांसाठी आणले जाणार आहे.
व्हॉट्सअॅपवर आणखी एक फीचर येत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना कॉलिंग शॉर्टकट तयार करता येणार आहे. हे फिचर अशा वापरकर्त्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे जे एकाच व्यक्तीला सतत कॉल करतात आणि पुन्हा पुन्हा त्याच प्रक्रियेतून जाऊ इच्छित नाहीत.