ताज्या बातम्या

Cheapest CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या दरातून मिळणार दिलासा ! घरी आणा 36km मायलेज असलेल्या ‘या’ स्वस्त CNG कार

Cheapest CNG Cars: देशात वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सध्या देशातील सीएनजी कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल

तर आम्ही तुम्हाला भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या काही जबरदस्त सीएनजी कार्सबद्दल माहिती देणार आहोत. ह्या कार्स तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देखील देणार आहे.चला तर जाणून घ्या या जबरदस्त कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

Maruti Celerio CNG (मायलेज: 35.60 किमी/किलो)

नवीन अवतारात आल्यानंतर मारुती सेलेरियोने लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. ही कार नुकतीच सीएनजी किटसह लॉन्च करण्यात आली आहे. याला 1.0 लिटर K10C इंजिन मिळते जे CNG मोडमध्ये 57hp पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करते. कार 35.60 किमी/किलो मायलेज देण्याचे वचन देते. Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये आहे. या कारचा लूक आणि तिची जागा खूप चांगली आहे. रोजच्या वापरासाठी ही एक उत्तम राइड आहे.

Tata Tiago CNG (मायलेज: 26.49 किमी/किलो)

Tata Tiago iCNG हा एक उत्तम पर्याय आहे, ही CNG मोडवर सुरू होणारी पहिली कार आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 6,27,900 ते 7,79,900 रुपये आहे. ARAI नुसार, ही कार एक किलो CNG मध्ये 26.49 किमी मायलेज देईल. कार फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटसह येते. Tiago iCNG 1.2-लिटर रेव्होट्रॉन इंजिनसह येते जे 73PS पॉवर निर्माण करते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प, ड्युअल-टोन रूफ, रेन सेन्सिंग वायपर्स यांसारखे फिचर्स दिसत आहेत, तसेच या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे.

Maruti S-Presso CNG (मायलेज: 32.73 किमी/किलो)

मारुती सुझुकीची S-Presso आता CNG व्हर्जनमध्येही आली आहे. यात Next Gen K-Series 1.0L Dual Jet, Dual VVT पेट्रोल इंजिन आहे जे 56.69 PS पॉवर आणि 82.1Nm टॉर्क देते. कार 32.73km/kg मायलेज देते ज्यामुळे ती किफायतशीर कार बनते.

तर पेट्रोल मोडवर ही कार 25 kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्याचे वचन देते. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि एजीएस गिअरबॉक्सची सुविधा आहे. एवढेच नाही तर हे इंजिन आयडल-स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या तंत्रज्ञानामुळे इंधनाची बचत होते. S-Presso LXi S-CNG ची किंमत 5.90 लाख रुपये आहे तर S-Presso VXi S-CNG ची किंमत 6.10 लाख रुपये आहे. सीएनजी किट व्यतिरिक्त यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

हे पण वाचा :- Astro Upay 2023: नवीन वर्षात राशीनुसार करा ‘हे’ खास उपाय ; कधीच भासणार नाही धन-समृद्धीची कमतरता !

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts