अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- ओळख व मैत्रीसंबध वाढवून चारचाकी पळविल्याची घटना शिर्डीत घडली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले,
की शिर्डी शहरात राहणारा व ओळख वाढवून संतोष गोवर्धन रोकडे (राहणार निंबळक, जिल्हा अहमदनगर) याने ‘लग्नाचे काम असून
गाडी चार दिवसासाठी दे’ असे सांगून १७ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गाडी नेली. मात्र त्यानंतर अनेक वेळा मागणी करूनही टोयाटो इटीऑस ही कार आणून दिलेली नाही.
या वाहनाचा हा आरोपी स्वत:च्या फायद्याकरता वापर करीत असून गाडी मागितली असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहे.
अशी तक्रार सुनील राजेंद्र मिसाळ यांनी शिर्डी पोलिसांत दिल्याने पोलिसांनी रोकडे याच्या विरोधात भा.दं.वि. ४०६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे