ताज्या बातम्या

Shinde Group MLA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली, आमदार नाराज; राजकीय भूकंप होण्याची शक्यता !

Shinde Group MLA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेतून काढता पाय घेतला. त्यानंतर भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र आता काही महिन्यातच शिंदे गटातील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर येताना दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे आमदार सुहास कांदे नाराज आहेत का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. सुहास कांदे हे शिंदे गटाचे पहिले बंड करणारे आमदार आहेत.

शिंदे गटातील आमदारांची नाराजी एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना सुहास कांदे यांची गैरहजेरी अनेकांच्या मनात प्रश्न करून गेली.

सुहास कांदे हे नांदगाव मतदार संघाचे आमदार आहेत. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या एकतर्फी कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली.

सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत नाराज नसल्याचे सांगितले. मात्र सुहास कांदे यांनी नाराजीचा सूरच ऐकवला. कांदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले त्यावरून ते नाराज असल्याचे दिसत आहेत.

सुहास कांदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडातील मी पहिला आमदार असतांना नाशिक जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करतांना मला विश्वासात घेतले जात नाही.

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याबद्दल आदर मात्र त्यांनी घेतलेल्या कुठल्याही बैठकांना आमदार म्हणून मला बोलावले जात नाही, साधे निमंत्रण सुद्धा दिले जात नाही असे म्हणत सुहास कांदे यांनी मनातील खंत व्यक्त केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts