ताज्या बातम्या

मुख्यमंत्री शिंदे यांचा थेट अजित पवारांनाच दणका, बारामतीसंबंधी घेतला हा निर्णय

Maharashtra news:शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारने मंजूर केलेली कामे रद्द करण्यास अगर स्थगित करण्याचा सपाटाच सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांची कामे रद्द केल्यानंतर आता त्यांनी थेट विरोधीपक्ष नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच दणका दिला आहे.

नगर विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या ९४१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यातील २४५ कोटींची कामे एकट्या बारामतीमधील आहेत.शिवसेनेत फूट पडण्यामागे निधी दिला जात नसल्याचे एक कारण सांगण्यात येत आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे या सर्वांचा रोष होता. केवळ शिवसेनाच नव्हे तर काँग्रेसचे आमदारही यासंबंधी तक्रारी करीत होते. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आधीच्या सरकारची कामे रद्द करण्यास सुरवात केली आहे.

त्यामध्ये मार्च ते जून २०२२ या काळात वित्त विभागाने मंजूर केलेल्या नगर विकास विभागातील ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. एकट्या बारामती नगरपालिकेतील २४५ कोटी रुपायांच्या कामांचा यात समावेश आहे. हा थेट पवार कुटुंबियांना दिलेला हा दणका असल्याचे मानले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts