ताज्या बातम्या

Child marriage: शहरात बालविवाह ;  आई- वडीलसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

 Ahmednagar :  शहरातील नवनागपूर (Navnagpur) परिसरात एका अल्पवयीन मुलीचा (minor girl) तिच्या इच्छेविरुद्ध लग्न (Child marriage) लावून देणाऱ्या आई- वडील यांच्यासह सात नातेवाईकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात ग्रामसेवक अधिकारी संजयविश्वनाथ मिसाळ (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 जून, 2022 रोजी दुपारी पीडित अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आई-वडिल, चुलते यांनी गुपचुप लावून दिला. विवाहाची माहिती कोणालाही समजु नये म्हणून नातेवाईकांनी फोटोग्राफर लावला नाही, दारासमोर मंडप दिला नाही. याबाबतची तक्रार पीडित मुलीने केली. 

यानंतर फिर्यादी यांनी 22 जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडितेच्या सात नातेवाईकांविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक फौजदार लोखंडे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts