Chinese Smartphone Ban : 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चायनीज कंपन्यांच्या (Chinese companies) चायनीज फोनवर (Chinese phones) भारतात बंदी घालण्याबाबत सरकारकडून (government) विधान करण्यात आले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajiv Chandrashekhar) यांनी या फोनवरील बंदी नाकारली आहे. चिनी कंपन्यांच्या या फोनवर बंदी घालण्यासाठी सरकारने अद्याप कोणतीही योजना केलेली नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
भारतीय ब्रँडचा प्रचार करणे ही सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. जर अनुचित व्यापार पद्धतींमुळे भारतीय स्मार्टफोन ब्रँडवर बहिष्कार टाकला जात असेल, तर आम्ही हस्तक्षेप करून निराकरण करू.
खरं तर, अलीकडेच भारतात 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चायनीज फोनवर बंदी घालण्यात आल्याची बातमी आली होती.
लावा (Lava) , मायक्रोमॅक्स (Micromax) या देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा दावा केला जात होता. मात्र, आता केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
चिनी कंपन्यांनी भारतीय स्मार्टफोन मार्केट काबीज केले आहे
या चिनी कंपन्यांपुढे देशांतर्गत कंपन्या टिकू शकत नाहीत. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंटनुसार, भारतात 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 80 टक्के फोन चिनी कंपन्यांचे आहेत.
म्हणजेच, भारताच्या मिड-सेगमेंट (mid-segment) आणि बजेट-सेगमेंट (budget-segment) स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. काउंटरपॉईंटनुसार, जून 2022 च्या तिमाहीत भारताच्या विक्रीपैकी $150 पेक्षा कमी स्मार्टफोनचा वाटा एक तृतीयांश होता आणि शिपमेंटमध्ये 80% वाटा चिनी कंपन्यांचा आहे.