Cholesterol lowering Tips : शरीराला कोलेस्ट्रॉल (Cholesterol) गरजेचे असले तरी शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे हृदयासंबंधी अनेक आजारांचा (Heart Disease) सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते.
परिणामी हृदयविकाराचा धोकाही निर्माण होतो. अधिक तेलयुक्त आहार (Oily diet) घेतल्याने तसंच सिगरेट पिणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.काही लोकांचा असा विश्वास आहे की गरम पाणी प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
गरम पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते का?
गरम पाणी (Hot Water) पिण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. यामुळे पोटाची चरबी (Fat) कमी होते, परंतु यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ शकते. हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. परंतु गंभीर रुग्णांनी गरम पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तुम्ही दररोज कोमट पाणी पिऊ शकता
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात २ चमचे मध (Honey) मिसळून प्या. यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलमध्येही आराम मिळतो. म्हणजेच गरम पाण्यात मध मिसळून सेवन केल्याने तुम्हाला फायदा होईल. यामुळे वजनही नियंत्रणात राहील.