CIBIL Score : सिबिल स्कोर खराब असला तरीही तुम्हाला मिळेल कर्ज, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

CIBIL Score : पैशांची गरज प्रत्येकाला असते. काही जणांकडे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे अनेकजण कर्ज घेत असतात. कमीत कमी व्याज देणाऱ्या बँकेकडून प्रत्येकजण कर्ज घेतात. यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असावा लागतो.

परंतु जर तुमचा CIBIL स्कोर खराब असेल तर कर्ज मिळणार नाही. आता तुमचा सिबिल स्कोर खराब असला तरी तुम्हाला सहज कर्ज मिळेल. कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.

गोल्ड लोन

तुमच्याकडे सोने असेल तर त्यावर तुम्हाला कर्ज घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले जात असून तुम्हाला सोन्याच्या सध्याच्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. त्यात फारशी कागदपत्रे गुंतलेली नाहीत किंवा तुमचा CIBIL स्कोअर पाहिला जात नाही.

पगारावर आधारित कर्ज –

कर्ज देत असताना तुमच्या क्रेडिट स्कोअर शिवाय, अनेक वित्तीय संस्था तुमचा पगार पाहतात. समजा तुमचा CIBIL स्कोर कमी असल्यास तर तुम्ही पगार, वार्षिक बोनस किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न स्त्रोताचा पुरावा देऊन बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकता, याद्वारे तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे सिद्ध करता येईल. तसेच, तुम्ही ज्या कामाच्या ठिकाणी काम करता, त्याठिकाणी तुम्हाला कधी-कधी अॅडव्हान्स सॅलरी घेण्याचा पर्याय मिळतो.

NBFC

समजा तुम्हाला कर्जाची खूप गरज असल्यास तर तुम्ही NBFC मध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता. या ठिकाणाहून कमी स्कोअर असतानाही तुम्हाला कर्ज सह्ज मिळेल. येथील कर्जावरील व्याजदर बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त असते, हे लक्षात घ्या.

बँक एफडी कर्ज –

तुमच्या बँकेत FD जमा असल्यास तुम्हाला ती आता खंडित करायची नसल्यास तुम्हाला त्या FD वर बँकेकडून कर्ज घेता येते. बँका FD वर जमा केलेल्या रकमेच्या 90% ते 95% कर्ज देतात. समजा ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असल्यास तर तुम्ही या सुविधेअंतर्गत जमा करण्यात आलेल्या रकमेच्या 90 टक्के रक्कम घेता येईल.

ही कर्जाची रक्कम सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवली जात असून बँक कर्जाच्या बदल्यात ती एफडी गहाण ठेवत असते. FD वर घेतलेल्या कर्जावरील व्याज हे FD दरापेक्षा 2% जास्त असून यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारले जाते. कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवर व्याज आकारण्यात येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts