अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- पावसाचा जोर ओसरला असला तरी आज, गुरुवारपासून पुढील दोन दिवस गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली.
या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांनी आपले घर गमावले. या महापुरानंतर आता राज्यातील पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं दिसत आहे. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान मध्य महाराष्ट्रात जुलैला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या तीन दिवसात कोकण आणि गोव्याच्या दुर्गम भागात पावसाच्या जोरदार हालचाली होऊ शकतात. 30 आणि 31 जुलै रोजी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होणार म्हणून राज्यात ऑरेंड अलर्टटा इशाराही देण्यात आला आहे.